Miraj Rd, Wanlesswadi, Sangli – 416414 Maharashtra, INDIA

  General Helpline: 0233-2212780 |  Emergency: 0233-2212780

भारती हॉस्पिटलमार्फत सुमारे ६०० रा. प. कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी

भारती हॉस्पिटलमार्फत सुमारे ६०० रा. प. कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी

येथील भारती हॉस्पिटलमधील ऑप्टोमेट्री कॉलेजने सुमारे ६०० रा.प. कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी केली.

सांगली विभागातील सांगली, मिरज, तासगांव, विटा, पलूस, ईश्वरपूर, शिराळा, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या आगारातील कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, कामगार अधिकारी प्रविण पाटील यांच्यासह सर्व आगार प्रमुखांचे सहकार्य लाभले.

एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक यांच्या आरोग्याची, विशेषत: डोळ्यांची काळजी घेण्याच्या उद्देशाने या विशेष शिबीराचे आयोजन केले होते. चालक सुरक्षित तर प्रवासी सुरक्षित ही भावना ठेवून नेत्ररोग तज्ञांनी तपासणी केली. शिबीरात अत्याधुनिक संगणकीय मशिनद्वारे दृष्टीदोष तपासणी, मोतीबिंदू व काचबिंदूचे निदान करण्यात आले. दृष्टीदोष आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर भारती हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार करणार असल्याचे ऑप्टोमेट्रीच्या प्रा. विद्या श्रीराम यांनी सांगितले.

यावेळी ऑप्टोमेट्रीच्या सुचना शिरोडकर, शुभम देशपांडे आणि दिपेश भोसले‌. ऑप्टोमेट्री विद्यार्थी अन्विथा पुजारी, प्रतिक पाटील, प्रणाली लकडे, अमिना तहसीलदार, संजना फलटणकर, सत्यजित मोहिते, कुनाल कोदंडे, वैभव माळी, सेजल रिसवडे, अभिजित म्हेत्रे, श्रुती पाटील, प्रणाली यादव. नेत्र विभागातील डॉ. अस्मिता मोरे, डॉ. नित्या शेंडे, डॉ. मानसी आजगेकर, डॉ. अशीमा दलाल, डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. स्नेहा लोधी, डॉ. शिवानी पाटील उपस्थित होते.

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे उपाधिष्ठाता डाॅ. अजित जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, मानव संसाधन विभागप्रमुख श्वेता कुलकर्णी यांची मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *