Miraj Rd, Wanlesswadi, Sangli – 416414 Maharashtra, INDIA

  General Helpline: 0233-2212780 |  Emergency: 0233-2212780

भारती हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेच्या मेंदुतील मोठ्या ट्युमरवर यशस्वी शस्त्रक्रिया

भारती हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेच्या मेंदुतील मोठ्या ट्युमरवर यशस्वी शस्त्रक्रिया

येथील भारती हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिला रूग्णाच्या मेंदुतील मोठा ट्युमर यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला. न्यूरोसर्जन डॉ. देवदत्त पाटील यांनी तीन तासात ही शस्त्रक्रिया केली.

डॉ. देवदत्त पाटील यांनी सांगितले की, चालताना तोल जाणे, उलटी, मळमळ, चक्कर येणे, उजव्या पायाची ताकद कमी होणे. अशी लक्षणे रुग्णाला जाणवत होती. प्राथमिक उपचार व औषधोपचाराने काही कमी आले नाही. नंतर भारती हॉस्पिटलमध्ये मेंदुचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यामध्ये डाव्या बाजूला मेंदुत बऱ्यापैकी गाठ मोठी दिसली. ८.५ सेमीची ती गाठ होती. पुढे मेंदुचा एमआरआय केला. आणि शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती नातेवाईकांना दिली. शस्त्रक्रियेचा फायदा जास्त व तोटा कमी असल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना समजावून सांगितले. सर्व तपासणीअंती शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला. 

महात्मा फुले योजनेतून ही गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली.गाठीचा हिस्टोपॅथाॅलाॅजीकल रिपोर्ट मेंनींजिओमा (बिनाईन) असा आला आहे.गाठ पूर्णपणे काढली गेली. थोड्या वेळातच महिला रुग्ण शुद्धीवर आली. मशीन व्हेंटिलेटरची गरज लागली नाही. दुसऱ्या दिवशी जनरल वॉर्डात ठेवण्यात आले. पाच दिवस उपचार केल्यानंतर महिला रुग्णाला घरी सोडण्यात आले. आता तब्येत ठीक आहे. यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल न्यूरोसर्जन डॉ. देवदत्त पाटील यांचे कौतुक केले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. आशुतोष श्रीवास्तव, सर्जरी रेसिडेंट डॉ. पलाश पंचभाई, भूलतज्ज्ञ डॉ. अस्मिता कर्नाळकर, डॉ. मशाबी, डॉ. श्रेयोशी उपस्थित होत्या. 

भारती हॉस्पिटलमध्ये याअगोदर अशी शस्त्रक्रिया केली होती. ५०० ग्रॅमची गाठ मी प्रथमच काढली. मोठी आव्हानात्मक व गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया होती. मेंदूत रक्त वाहिन्यांचे जाळे असते. त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता अधिक असते. मेंदूला इजा न होता यशस्वी शस्त्रक्रिया केली. प्रशासनाचे सहकार्य लाभले.
-देवदत्त पाटील
न्यूरोसर्जन भारती हॉस्पिटल सांगली.

भारती विद्यापीठाचे कार्यवाह व आमदार डॉ. विश्वजीत कदम तसेच भारती हॉस्पिटल पूणेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांचे नेहमीच या हॉस्पिटलवर लक्ष असते. यामुळे एकाच छताखाली सामान्य माणसाला उपचार मिळतात. बऱ्याच गुतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होतात असे उपस्थितांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *